InterviewSolution
| 1. |
10 Lines on My School in Marathi Essay | Mazi Shala Nibandh |... |
|
Answer» माझ्या शाळेचे नाव 'किडलैंड इंग्लिश स्कूल' आहे.माझी शाळा खूप छान आहे.प्रत्येक वर्ग मोठा व हवेशीर आहे.भिंतींवर थोर व्यक्तींचे चित्र आहेत.तसेच माहितीचे फलकही आहेत. माझ्या शाळेचे आवार फारच सुंदर आहे.समोर एक मोठे मैदान आहे.तेथे आमच्या क्रीडा स्पर्धा होतात.बाजूलाच एक छोटी बाग आहे.शाळेच्या भोवती मोठमोठी झाडे आहेत. माझ्या शाळेत एक मोठे ग्रंथालय आहे.एक मोठे सभागृहही आहे.तेथे आमच्या सांस्कृतिक स्पर्धा व स्नेहसंमेलन होतात. माझ्या शाळेचे शिक्षक खूप चांगले शिकवतात.ते खूप प्रेमळ आहेत.ते आम्हाला उत्तेजन देतात. आम्ही आनंदाने शाळेत जातो.मुख्यध्यापक शिस्तीप्रिय व प्रेमळ आहेत. मी कधीही शाळा चुकवत नाही.शाळेला सुट्टी असली की मला कंटाळा येतो.माझी शाळा मला खूप आवडते. Explanation: |
|