1.

10 Lines, Sentences, Short Essay on Holi in Marathi | होळी विषयी...

Answer»

ANSWER:

होळी हा भारतामधील एक लोकप्रिय सण आहे.हा उत्सव फाल्गुन महिन्यात येतो.या सणाला 'रंगपंचमी','होळी पौर्णिमा','शिमगा' असेही म्हटले जाते.लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण हा रंगांचा सण उत्साहाने व आनंदाने साजरा करतात.

हिरण्यकशपू नावाचा एक अहंकारी राजा होता. त्याचा मुलगा प्रल्हाद विष्णु देवाचा मोठा भक्त होता.त्याने प्रल्हादला देवाची भक्ति करण्यपासून थांबवले,पण प्रल्हाद काय थांबला नाही.हिरण्यकशपूची बहिण होलिका हिला आगीपासून सुरक्षित राहण्याचा वरदान होता.त्यामुळे हिरण्यकशपूने अग्नी पेटवून त्यामध्ये होलिकेला प्रल्हादला मांडीवर घेऊन बसायला लावले.आपल्या वरदानाचा गैरवापर केल्यामुळे होलिका दहन झाली व प्रल्हाद सुखरूप राहिला.असे मानले जाते की या दिवसापासून होळी साजरा करतात.

होळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच होळी दहनला लाकडाच्या ढीगापासून होलिका तयार केली जाते.संध्याकाळी तिची पूजा झाल्यानंतर तिला पेटवले जाते. या दिवशी घरी पूरणपोळी, करंजी आणि इतर गोड पदार्थ बनवले जाते.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच धूलिवंदनाला लोक एकमेकांमधील रूसवे फुगवे विसरून आनंदाने नाचत गाजत,एकमेकांना रंग लावत हा सण उत्साहाने साजरा करतात.

भारताच्या विविध भागांमध्ये होळी वेगवेगळ्या प्रकारे साजरा केली जाते.

Explanation:



Discussion

No Comment Found