InterviewSolution
| 1. |
(१०) स्वमत. (अ) ‘स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे’, या विधानामागील अण्णांचा दृष्टिकोन स्पष्ट करा. (आ) ‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ हे वचन महर्षी कर्वेयांच्या जीवनाला कसे लागू पडते, ते स्पष्ट करा. (इ) ‘कर्ते सुधारक कर्वे’ या पाठातून महर्षी अण्णा कर्वेयांचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण, तुमच्या शब्दांत सांगा. |
|
Answer» र,सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) पुस्तकातील 'कर्ते सुधारक कर्वे (लेखक- डॉ. शिरीष देशपांडे)' या गद्यातील आहे.★ स्वमत - (अ) स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे, या विधानामागील अण्णांचा दृष्टिकोन -उत्तर- अण्णांच्या मते, स्रियांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांना शिक्षण देणे महत्वाचे आहे. स्रिया म्हणजे अर्धा समाज जर त्या अशिक्षित राहिल्या तर अर्धा समाज मागासलेला राहील. स्रियांच्या सुधारणेसाठी त्यांचे शिक्षण होणे आवश्यक आहे.(आ) जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण हे वचन महर्षी कर्वेयांच्या जीवनाला कसे लागू पडते उत्तर- महर्षी कर्वे हे स्रियांना स्वतंत्र करण्यासाठी आयुष्यभर कार्यरत होते. या त्यांच्या विचाराला समाजाने कडक विरोध केला. काही नाठाळ लोकांनी त्यांच्यावर हल्ले चढवले. टिकाकारांशी वाद न घालता शांतपणे ते कार्य करत. त्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला.(इ) ‘कर्ते सुधारक कर्वे’ या पाठातून महर्षी अण्णा कर्वे यांचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण -उत्तर- महर्षी कर्वे हे खूप विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. ते फक्त दुसऱ्यांना सांगून शांत बसत नव्हते. समाजात सुधारणा पाहिजे असेल तर आपणच सुरुवात केली पाहिजे हे त्यांचं मत होतं. स्त्रीयांना स्वतंत्र करणे यालाच त्यांनी आयुष्याचे ध्येय बनवले. त्यांना लोकांनी त्यांच्या या कार्याला भरपूर विरोध केला, परंतु त्या टीकाकारांना शब्दाने उत्तर देण्यापेक्षा कृतीने उत्तर द्यायचे महर्षींनी ठरवले. यातून त्यांचे वेगळेपण दिसून येते.धन्यवाद..." |
|