1.

1818 साली कोणती सत्ता संपुष्टात आली

Answer»

ANSWER:

पेशवाई बुडाली ती १८१८ साली.

EXPLANATION:

पेशवाईचा अस्त १८१८ साली झाला, असं साधारणपणे आपण समजतो. या घटनेला यंदा दोनशे वर्ष पूर्ण झाली आहेत. पण पेशवाईचा अस्त म्हणजे काय, हे नेमकं समजावून घेण्यासाठी पेशव्यांचा सार्वभौम राजकीय सत्ताधारी म्हणून अंमल नेमका कधीपासून संपला, हे पाहावं लागतं. पेशवाईचा अंतकाळ अत्यंत दुर्दैवी घटनांनी भरलेला आहे.  

दुसऱ्या बाजीरावाला ‘पळपुटा बाजीराव’ अशी पदवी समाजानं कधीच बहाल करून टाकलीय. दुसऱ्या बाजीरावाचा वासनांध, मत्सरी, खुनशी आणि तेवढाच भेकड स्वभाव इतिहासात नेहमीच चर्चेत राहिलाय. मराठेशाहीला उत्तुंग नेतृत्वाची गरज होती, नेमक्या त्याच काळात कचखाऊ, नेभळा आणि वासनांध पुरुष पेशवेपदी आल्यामुळं देशाचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालं.

नारायणराव पेशवा यांच्या खुनाचा आरोप असलेल्या रघुनाथराव पेशव्यांचा आनंदीबाईपासून झालेला पुत्र म्हणजे दुसरा बाजीराव. सत्ताभिलाषी असलेले रघुनाथराव हे इंग्रजांना मिळाल्यानं पहिलं इंग्रज मराठा युद्ध झालं. दुसऱ्या बाजीरावाचा जन्म झाला, तो रघुनाथराव आणि आनंदीबाई नजरकैदेत असताना. वयाच्या एकोणिसाव्या वर्षापर्यंत तो नजरकैदेतच वाढला. त्यानंतर त्याची सुटका झाल्यानं तोपर्यंत त्याला कोणतंही औपचारिक शिक्षण मिळालं नाही. तसंच राज्यकारभाराचेही कोणते धडे मिळाले नाही. शिवाय जनतेत त्याची प्रतिमा नेहमीच एका खुन्याचा मुलगा अशी राहिली.



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions