1.

25. 'हिंदु राष्ट्राचे पुरस्कर्ते कोण आहे? 2 points​

Answer»

हिंदू राज्य’ आणि ‘हिंदू राष्ट्र’ हे शब्द स्वातंत्र्यपूर्व काळात आगरकरांपासून आंबेडकर–सावरकर यांच्यापर्यंत अनेकांनी वापरले; तर स्वातंत्र्योत्तर काळातही ‘भौगोलिक वा पाश्चात्त्य राष्ट्रसंकल्पनेच्या चौकटीत हिंदू राष्ट्रीयता बसू शकत नाही’ हे म्हणणे रा. स्व. संघाने कायम ठेवले. चार्वाकांचा भौतिकवाद, जैनांचा अहिंसावाद किंवा बुद्धांच्या अष्टांगिक मार्गाना या नव्या ‘हिंदू राष्ट्रवादा’त स्थान काय, हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो.. अनेकांना वाटत असते, की फाळणी होऊन ज्या अर्थी पाकिस्तान हे इस्लामिक राष्ट्र बनले, त्या अर्थी उर्वरित भारत हिंदू राष्ट्र बनायला पाहिजे होते. असे न करून गांधी-नेहरूंनी मोठा प्रमाद व हिंदूंवर अन्याय केला, असेही त्यांना वाटत असते. एवढेच नाही, तर भारताला हिंदू राष्ट्र बनविण्याचा काही जणांनी संकल्प केला असून, एका दिवशी ते प्रत्यक्षात येणार याबद्दल त्यांना खात्री वाटते. गमतीची गोष्ट ही की, हिंदू राष्ट्र बनणे म्हणजे नेमके काय हे जनतेसाठी एक कोडे बनले आहे. देशात हिंदूंची बहुसंख्या आहे म्हणून भारताला ‘हिंदुस्थान’ म्हणण्याची पद्धत ब्रिटिशपूर्व काळापासून आहे. EXPLANATION:



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions