InterviewSolution
| 1. |
(३) ‘पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं’, स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा. |
|
Answer» र,सदर प्रश्न मराठी कुमारभारती (१० वी) पुस्तकातील 'वीरांगना' या स्थूलवाचनातील आहे.★ पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला मिळणारा संदेश -उत्तर- स्वाती महाडिक यांचे पती संतोष महाडिक यांना पाकिस्तानी दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले. अशा स्तिथीत स्वाती खचून गेल्या नाहीत, या गोष्टीला त्यांनी दुर्दैव मानले नाही. आपल्या पतीने देशाची सेवाच केली, हे लक्षात घेऊन त्यांनी स्वतःच सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्धारातून समाजाने त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. प्रत्येकाने त्यांच्यासारखे करारी, निग्रही आणि धाडसी बनले पाहिजे. आपणही त्यांच्यासारखे देशसेवेचे व्रत घेतले पाहिजे. आजकालच्या या पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीयाही समाजातील खडतर कष्टाची कामे करू शकता हे लक्ष्यात घ्यावे. धन्यवाद..." |
|