InterviewSolution
| 1. |
(४) काव्यसौंदर्य (अ) खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा. ‘जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये । पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।’ (अा) ‘सभेमध्यें लाजों नये । बाष्कळपणें बोलों नये ।’, या ओळीतील विचार स्पष्ट करा. (इ) ‘आळसें सुख मानूं नये’, या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा. |
|
Answer» र मित्रा-हे तिन्ही प्रश्न कुमारभारती(१० वी) च्या उत्तमलक्षण या संतकाव्यातील आहेत. या काव्यात रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितलेली आहेत.(अ) या ओवीत संत रामदास महाराज सांगतात की - 'लोकांचे मन तोडू नये, त्यांच्या भावनांचा आदर करावा. वाईट मार्गाने संपत्ती मिळवू नये. नेहमी पुण्यामार्गाचा अवलंब करावा. कुणाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नये.'(आ) या ओवीत संत रामदास म्हणतात - 'सभेमध्ये असताना आपले मत मांडण्यास घाबरू नये. आपले विचार स्पष्टपणे पण कुणालाही वाईट वाटणार नाही अशे मांडावे. लहान मुलासारखे असंबद्ध बोलू नये'(इ) या पंक्तीत रामदास महाराज आळस हा चुकीचा आहे हे सांगताना बोलतात - 'आळस हा माणसाचा शत्रू आहे. त्यामुळे माणूस निष्क्रिय बनतो. म्हणून आळसाला आराम मानू नये.'धन्यवाद..." |
|