1.

४. खालील मुद्द्यांवर चर्चा करा -अ) परकीय आक्रमणास सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व.ब) राष्ट्रीय एकात्मतेसाठीच्या भारतीय संविधानातील तरतुदी.वरीलपैकी एका घटकाबद्दल चर्चा करून त्याचे मुद्दे लिहा.​

Answer»

ANSWER:

एकाच देशातील लोकांमध्ये आपण सर्वजण एकाच राष्ट्राचे नागरिक आहोत अशी समानतेची भावना असणे म्हणजे 'राष्ट्रीय एकात्मता' होय.

भारतासारख्या विशाल देशात अनेक जाती, धर्माचे, पंथाचे, वेगळी संस्कृती, भाषा, आचरण असणारे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत. भारतीय नागरिकांमधील हा सलोखा केवळ राष्ट्रीय एकतेमुळे टिकून आहे.

जेव्हा देशावर एखादे परकीय आक्रमण होते तेव्हा तेथील नागरिकांची भूमिका महत्त्वाची ठरते. अशावेळी नागरिकांनी घाबरून न जाता सरकारला आणि सैन्याला योग्य पाठिंबा देऊन परकीय आक्रमणाला धैर्याने तोंड देण्यासाठी त्यांचे मनोबल वाढवले पाहिजे. आपसांत न भांडता नागरिकांनी अशावेळी अंतर्गत शांतता कायम ठेवली पाहिजे. सुरक्षाविषयक सर्व सूचनांचे पालन केले पाहिजे. अशावेळीच राष्ट्रीय एकात्मता उपयोगी पडते.

Explanation:



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions