InterviewSolution
| 1. |
(४) उपक्रम (१) तुमच्या घरातील आजी, आजोबा, पणजोबा यांच्या काळात असणाऱ्या वस्तूंची माहिती मिळवा.(२) वस्तूंची नीट काळजी घेणाऱ्या आपल्या कुटुंबातील सदस्याची मुलाखत घेऊन संवादलेखन करा.(३) तुमच्या घरातील अडगळीत टाकलेली वस्तू/विकायला काढलेली वस्तू जर तुमच्याशी बोलू लागली, तर ती काय बोलेल याची कल्पना करून लिहा. |
|
Answer» ्रम (१) तुमच्या घरातील आजी, आजोबा, पणजोबा यांच्या काळात असणाऱ्या वस्तूंची माहिती मिळवा. उत्तर:- आमचे आजी-आजोबा नेहमी आम्हाला त्यांच्या काळातील वस्तूंच्या गोष्टी सांगत असत व ते सर्व ऐकून आम्हाला खूप मज्जा वाटायची, दळण दळण्यासाठी दगडाचे जाते, मसाले कुटण्यासाठी खलबत्ता, मिरची व डाळी वाटण्यासाठी पाट-वरवंटा, बाहेर फिरायला जाण्यासाठी छकडा , स्वयंपाक घरात तांबे पितळेची भांडी, झोपायला नेवार ने विणलेली लाकडी खाट, स्वयंपाक शिजवण्यासाठी गॅस म्हणून वापरण्यात येणारी चूल, खेळ खेळण्यासाठी लाकडी गिल्ली-दांडू अश्या अनेक वस्तूंची यादी ते सांगत असत. (२) वस्तूंची नीट काळजी घेणाऱ्या आपल्या कुटुंबातील सदस्याची मुलाखत घेऊन संवादलेखन करा. उत्तर:- मी :- नमस्कार काका, आज मी तुमच्या जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहे , मला सांगा या पारंपरिक व जुन्या वस्तूंची काळजी तुम्ही कशी घेता? काका :- नमस्कार मित्रा, खूप छान प्रश्न तू विचारला आहेस, या सर्व वस्तूंची मी नीट कलगी घेतो, ते व्यवस्थित साफ करून ठेवतो, कधी काही गोष्टीना रनवीन रंग देतो, तर कधी तेल पाण्यानी स्वच्छ धुतो, यात मला माझा मुलगा दिनूही आवडीने मदत करतो. मी :- अरे वा छान , काका मला सांगा ह्या सर्व वस्तू हाताळतांना काही त्रास होतो का? कारण या फार जुन्या वस्तू आहेत. काका :- त्रास नाही होत उलट गंमत वाटते, सर्व वस्तू परत एकदा निरखून पाहतांना बालपणीचे आई-बाबांसोबत घालवलेले दिवस आठवतात. मी :- काका तुम्हाला या सर्व वस्तू एखाद्या प्रदर्शनीत ठेवायला आवडेल का? काका :- हो नक्कीच आवडेल, आपले परंपरागत वस्तूंची नवीन पिढीला ओळख करून देण्यासाठी मी या सर्व वस्तू प्रदर्शनीत ठेवेल. मी :- धन्यवाद काका ,तुम्ही दिलेली माहिती माझ्या बाल मित्रांच्या नक्कीच कामात येईल. काका :- धन्यवाद मित्रा. (३) तुमच्या घरातील अडगळीत टाकलेली वस्तू/विकायला काढलेली वस्तू जर तुमच्याशी बोलू लागली, तर ती काय बोलेल याची कल्पना करून लिहा. उत्तर:- विनू ये विनू , कोण आहे... ,अरे मित्रा मला ओळखल नाहीस? विनू परत आश्चर्याने ईकडे-तिकडे पाहतो, परंतु कोणीच दिसत नाही. तेव्हाच अडगळीत पडलेली जुनी शाळेची बॅग समोर येऊन म्हणते, मित्रा गेली तीन वर्ष तू मला खूप आवडीने शाळेत, शिकवणीला,सहलीला नेत होतास, तुझ्या खोलीत मला ठेवत होतास ,माझी काळजी घेत होतास , पण आता........ बाबांनी तुला नवीन बॅग दिल्यावर तू मला अडगळीत आणून ठेवलेस, मला खूप वाईट वाटलं, जर तुला नवीन बॅग मिळाली तर तू मला एखाद्या गरजवंताला दे, त्यालाही आनंद होईल असता व मलाही , पण अस ईथे अडगळीत ठेऊ नकोस......... ! |
|