InterviewSolution
| 1. |
(५) काव्यसौंदर्य. (अ) ‘तुझे शब्द जसे कीमहाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीततुझा संघर्ष असा कीकाठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.’, या ओळींचे रसग्रहण करा.(आ) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कवितेतून जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दांत लिहा.(ई) अगाध ज्ञानाच्या बळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य, तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा. |
|
Answer» र,सदर प्रश्न मराठी कुमारभारती (१० वी) पुस्तकातील ज. वि. पवार यांच्या 'तू झालास मूक समाजाचा नायक' या काव्यातील आहे.★ काव्यसौंदर्य - पंक्तीचे रसग्रहण -उत्तर- प्रस्तुत कवितेत ज. वि. पवार यांनी आंबेडकरांना मूक समाजाचा महानायक म्हणून अभिवादन केले आहे. दिलेल्या पंक्तीत कवी म्हणतात की आंबेडकरांचे सरळ आणि कठोर बोलणे हे एखाद्या महाकाव्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. आंबेडकरांनी शोषितांसाठी केलेला संघर्ष एवढा महान होता की त्यामुळे लोकांच्या हातातील काठ्याच्या बंदुकांपेक्ष्या धोकादायक असत.★ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कवितेतून जाणवलेले कर्तृत्व -उत्तर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक श्रेष्ट विचारवंत होते. वर्णव्यवस्थेच्या जखडात अडकलेल्या पिडीत समाजामुळे जागृती आणण्याचे कार्य करणारे ते जणु एक महानायकच. त्यांनी समाजाला नवविचारांचा प्रेरणादायक मार्ग दाखवला. मार्गात येणाऱ्या सर्व समस्यांना सामोरे जाऊन त्यांनी एक इतिहास घडवला. दलित समाजाला त्यांनी योग्य तो सन्मान मिळवून दिला.★ अगाध ज्ञानाच्या बळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य -उत्तर- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञान अगाध होते. अथक परिश्रम घेऊन त्यांनी पदवी मिळवली. या ज्ञानाच्या बळावर आंबेडकरांनी दलित जनतेसाठी अनेक कामे केली. मूक समाजाचे नेतृत्व केले, चवदार तळ्याचा संग्राम केला, बहिष्कृत भारत जागा केला, परिस्थितीवर मात करुन नवीन इतिहास घडवला.धन्यवाद..." |
|