InterviewSolution
| 1. |
(५) ‘प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश’, पाठाच्या आधारे स्पष्ट करा. |
|
Answer» र,सदर प्रश्न मराठी कुमारभारती (१० वी) पुस्तकातील 'वीरांगना' या स्थूलवाचनातील आहे.★ आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश -उत्तर- या पाठात लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भावनाशील वीरपत्नी ते एक सज्ज वीरांगना हा प्रवास वर्णन केला आहे.पती संतोष महाडिक यांच्या वीरगती नंतर स्वाती खचून गेल्या नाहीत. त्यांनी पतीचे देशसेवेचे स्वप्न पुर्ण करण्याचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतला. भयंकर प्रयत्न करून सेनादलात लेफ्टनंट पदावरप्रवेश मिळवला. अमाप कष्ट घेतले. सगळ्या संकटांवर मत करून त्यांनी सैनिकत्व भूषवले. सगळ्या जगासमोर त्यांनी एक आदर्श ठेवला. परिस्थिती कोणतीही असो आत्मविश्वास आणि अथक परिश्रम घेणे यशाचे साधन आहे ते त्यांनी सिद्ध केले.धन्यवाद..." |
|