1.

(९) स्वमत (अ) चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा. (आ) चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या चित्रलिपीतली विरामचिन्हे म्हणतात, या विधानाची सत्यता पटवून द्या. (इ) वसंतऋतूशी निगडित तुमची एखादी आठवण समर्पक शब्दांत लिहा.

Answer»

र मित्रा,★ चैत्रातील पिंपळाची नवपालवी -चैत्रातील गुलाबी रंगाची ती नावपालवी मनाला मोहून टाकते. तो गुलाबी रंग जेव्हा उन्हात चमकतो तेव्हा ते दृश्य खूप आकर्षक दिसते.★ पक्ष्यांची घरटी- वसंतलीपीतील विरामचिन्हे -वसंत ऋतूत सगळीकडे सुंदर निसर्ग बघायला मिळतो. फुलांचा सुगंध पसरलेला असतो फळांची रस असते.  हे सगळे जणू वसंतऋतुची चित्रलिपिच. आणि या सगळ्या दृश्यात ती मनमोहक पक्ष्यांची घरटी.  स्वल्पविराम सारखे आपण क्षणभर थांबून या घरट्यांशेजारी आनंद घेतो.★ वसंतऋतुतील आठवण -मी तसा शहरात राहतो. पण एकदा आजोळी गेलो होतो तो वसंत अजून आठवतोय. ते पांढरे चाफ्याचे झाड, जमिनीवर पडलेल्या फुलांचा सडा, विविध फुलांच्या पाकळ्या या सगळ्यांने माझे मन बहरून गेले. आता या वसंतात पुन्हा कोकणात जायचा बेत आहे.धन्यवाद..."



Discussion

No Comment Found