InterviewSolution
| 1. |
अ कोणतीही एक कृती सोडवा. ३) चिमणीचे आत्मवृत्त |
|
Answer» हल्ली तुम्हाला आमची चिव चिव ऐकू येत नाही ? होय ना ! कशी ऐकू येणार ? कारण आता आमची संख्याच कमी झाली आहे. " पुर्वी तुमची घरे मातीची होती . घरटे बांधन्यासाठी घरोघरी जागा मिळत असे . आता मोठमोठ्या इमारतींमुळे आमची घरटीच राहिली नाहीत . पुर्वी प्रत्येक घरातून दाने मिळत असे. आता मात्र आम्हाला कुणीच दाने देत नाही . आता सगळ्यांची दारे खिडक्या बंद असतात . पुर्वी दार बंद असले की, हळूच खिडकीतून आत शिरायचो . तुमच्या सहवासात राहुन आम्हला खूप आनंद व्हायचा. लहान बाळ रडले की , चिव चिव करुन लक्ष वेधून घ्यायचो. बाळाचे रडणे थांबले की, आम्हाला बर वाटायच. छोट्या झाडांवर आमचा थवा चिव चिव करायचा . आता झाडे तोडली जात आहेत . आम्ही कोठे बसणार ? कुठे एकत्र खेळणार ? शेतात दाणे टिपायला जायचे ,तर गोफणीतून दगड फेकतात . आम्ही जखमी होतो . विजेच्या तारांमुळे शाॅक लागून मरतो . पतंगाचा मांजा ला आम्ही बळी पडतो . आमची पंख कापले जातात . तुमची प्रगति व्हावी ,जीवन सुरळीत व्हावे म्हणून तुम्ही मोबाइल चा शोध लावला . मोबाइल चे टाॅवर यांच्यामुळे आम्हाला इजा होते . आमची संख्या दिवसें दिवस कमी होत आहे . याला कारणीभूत कोण ? एवढासा आमचा जीव ! किती सहन करणार ? आम्हाला तुमच्या सोबत राहायला आवडते . पण आता ते शक्य नाही , आमच अस्थित्व संपेल , असे वाटते ." काही वर्षांनी तुम्ही आम्हाला फक्त चित्रातच पाहाल ! " |
|