InterviewSolution
| 1. |
आई गुरु आई कल्पतरू निबंध |
Answer» HELLO mate⚘आई या जीवनदायी शब्दाची जादू प्रत्येक बालकाच्या मनावर तो जन्माला आल्यापासून तर त्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत नेहमीच असते . 'आ ' म्हणजे आत्मा आणि 'ई' म्हणजे ईश्वर . म्हणजेच आत्मा आणि ईश्वर यांचे मिलन ज्या ठिकाणी होते तो महासंगम म्हणजे आई. आई म्हणजे हृद्याची हाक, निशब्द जाग आई म्हणजे गुंज अंतरीचे , नाव परमात्म्याचे. आई म्हणजे नसे केवळ काया, आई म्हणजे हृद्याची हाक, निशब्द जाग आई म्हणजे गुंज अंतरीचे , नाव परमात्म्याचे. आई म्हणजे नसे केवळ काया, तर ओंजळभर माया, आई म्हणजे आभाळ सावली, दुधाळ माऊली. आई म्हणजे गगन भरारी, पंढरीची वारी, आई म्हणजे एक अक्षयगाण कर्णाचे दान . आई म्हणजे खळाळता झरा समुद्राची लाट सारे विश्व जोडणारी आई सुंदरशी वाट. सुख-आनंद,स्तुती-सुमन,आदर-मानसन्मान आई माझा गुरु, आई कल्पतरू, सुखाचा सागरू आई माझी,प्रीतीचे माहेर, शांतीचे आगर, मांगल्याचे सार, आई माझी...'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' या उक्तीची मनोमनी साक्ष देत.. मातृदिनानिमित्त सर्व मातांना वंदन!! |
|