1.

आजपासून मी बस ने ये-जा करणार .​

Answer» ONG>ANSWER:

महाराष्ट्राची लाईफलाइन समजली जाणारी लालपरी अर्थात एसटी बस अखेर आता सुरू झाली आहे. जिल्ह्याअंतर्गत प्रवास करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दिल्यानंतर आज सकाळपासून एसटी बसेस धावण्यास सुरुवात झाली. नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत शासनाच्या निर्णयाचं स्वागत केले आहे. तर कुठे फटाके फोडून लालपरीचे स्वागत करण्यात आले आहे.

राज्य परिवहन महामंडळाने आजपासून एसटी बसेस सुरू करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर पुण्यातील

स्वारगेट बस स्थानकातून पहिली आंतरजिल्हा बस सकाळी साडेआठला सुटली. तब्बल पाच महिन्यानंतर एसटीची आंतरजिल्हा बस सेवा सुरू झाली. स्वारगेट ते बोरीवली अशी ही बस आहे.  कोकण, सोलापूर, कोल्हापूरलाही स्वारगेटवरून गाड्या सुटल्या आहे. स्वारगेट बस स्थानकातून कोल्हापूरला निघालेल्या शिवशाही बसला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. मोठ्या दिमाखात ही शिवशाही आता कोल्हापूरकडे निघाली आहे.

तर सोलापुरातून पहिली एसटी बसही पुण्याला रवाना झाली आहे. सोलापूर शहरातील एसटी बसस्थानकातून सकाळी ही बस पुण्याच्या दिशेनं रवाना झाली. या बसला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. एवढंच नाहीतर फटाके फोडून बसचे स्वागत केले आहे.

EXPLANATION:



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions