1.

Ashiya khandatil kontyahi eka vyapar sanghatneche kary liha

Answer»

ANSWER:

सार्क या व्यापारी संघटनेची रचना आणि कार्य

Explanation:

  1. नेपाळची राजधानी काठमांडू येथे १६ जानेवारी १९८७ रोजी सार्कच्या सचिवालयाची स्थापना करण्यात आली.
  2. सार्कच्या सरचिटणीसची नियुक्ती सदस्यदेशांमधून आळीपाळीने केली जाते. सदस्यदेशांमधल्या विविध शहरांतून विविध समित्यांमार्फत सार्कचे काम चालते.
  3. सार्कची वार्षिक परिषद (वर्षातून एकदा) देशांच्या नावाच्या आकारविल्हेनुसार त्या-त्या देशात भरते. तत्पूर्वी या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची वर्षातून दोनदा बैठक होते आणि त्या बैठकीला सदस्यदेशांचे राष्ट्रप्रमुख/पंतप्रधान उपस्थित राहतात.
  4. पूर्वी सदस्यदेशांतील मतभेदांमुळे या बैठका सौहार्दपूर्ण वातावरणात होत नसत.
  5. पाकिस्तान दहशतवाद्यांना देत असलेल्या पाठिंब्यामुळे आणि भारतात उरी येथील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यानंतर भारत, बांगला देश, भूतान आणि अफगाणिस्तान या देशांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये पाकिस्तानात होणा-या सार्कच्या बैठकीवर बहिष्कार घातला होता. त्यामुळे ही बैठकच रद्द करावी लागली.
  6. सदस्यदेशांच्या अंतर्गत वादाचा सार्कच्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून सार्कच्या बैठकीत युद्ध किंवा दोन देशांमधील संघर्ष यावर सहसा चर्चा होत नाही. पण संबंधित देशांना या बैठकीच्या वेळी परस्पर चर्चा करण्याची संधी सार्क देते. सार्कच्या शिखर परिषदांमध्ये दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी सदस्यराष्ट्रांच्या व्यापक सहकार्यावर नेहमीच भर देण्यात आला आहे..

.

.

.

I HOPE it's HELPFUL



Discussion

No Comment Found