InterviewSolution
| 1. |
अतिवृष्टी, महापुराचे थैमान मराठी, निबंध, भाषण, लेख |
|
Answer» अतिवृष्टी व महापुराचे थैमान अतिवृष्टी म्हणजे जोरदार पाऊस. अशा जोरदार आणि जास्त प्रमाणाचा पाऊस पडल्यामुळे जर पाणी साचले आणि लोकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले तर त्याला महापूर म्हणतात. ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. दर वर्षी कोकणात भरपूर पाऊस पडतो. ह्या गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली आणि रोहा शहरात पावसाने महापुरासह थैमान घातले. सुरवातीला जोरात पावसाला सुरवात झाली पण नेहमी पावसाची सवय असलेल्या रोहेकरांना काही नवीन वाटले नाही. रात्र भर पाऊस पडला आणि कुंडलिका नदीला भरती आली. सकाळी पहिले तर नदीचा पूल बुडून गेला होता आणि काही दुकानांमध्ये पाणी भरले होते. रस्त्यावर सुद्धा पाणी भरले होते आणि पाऊस वाढत चालला होता. ज्यांचा घरात पाणी भरले त्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. ह्या महापुरात खूप नुकसान झाले. गायी म्हशी वाहून गेल्या. वाहने वाहून गेली. सुदैवाने जिवीत हानि झाली नाही तरी मालमत्तेचे भरपूर नुकसान झाले. |
|