InterviewSolution
| 1. |
बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना मराठी निबंध | Essay on Beti Bachao... |
|
Answer» जीवनातील प्रत्येक क्षेत्रात इतकी प्रगती करून सुद्धा काही लोकांना मुलगी नकोशी वाटते.देशात,स्त्रीयांवर होणारे गुन्हे जसे स्त्रीभ्रूणहत्या,बलात्कार,घरगुती हिंसा,हुंडाबळी यांचे प्रामाण वाढले आहे. हे सगळं लक्षात घेता,भारत सरकार काही कठोर उपाय करत आहे. त्यापैकी एक म्हणजे 'बेटी बचाओ बेटी पढ़ाओ'योजना.या योजनेची घोषणी प्रधानमंत्री मोदी यांनी हरियाणा मधील पानीपत येथे २२ जानेवारी,२०१५ रोजी केली.मुलींचे कमी लिंग गुणोत्तर प्रमाण असलेल्या १०० जिल्ह्यांमध्ये याची सुरूवात केली गेली. महिलांच्या हक्कांबाबत जागरूकता वाढविणे, मुलींचे कमी होत असलेले लिंग गुणोत्तर प्रमाणावर आळा घालणे, देशातील महिलांची स्थिती सुधारण्यासाठी महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे ,मुलगा-मुलगीमधील भेदभाव आणि लैंगिक निर्धारण चाचणीचा सराव रोखणे, मुलींचे अस्तित्व आणि संरक्षण सुनिश्चित करणे, शिक्षण आणि इतर क्षेत्रात मुलींचा सहभाग सुनिश्चित करणे, हे या योजनेचे हेतु आहे. मुलगा-मुलगीमध्ये भेदभाव न करून, मुलीला उच्च शिक्षण देऊन,तिच्या पसंतींना पाठींबा देऊन,समाजातील लोकांचे मुलीकडे पाहण्याचे दृष्टिकोण बदलून,मुलींसाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण करून आपणसुद्धा आपल्या तऱ्हेने या योजनेस पाठींभा देऊ शकतो. Explanation: |
|