1.

भारतातील शेती व्यवसायाचे स्वरूप स्पष्ट करा​

Answer»

शेतीची सुरुवात आणि भारतीय शेतीची आजवरची वाटचाल याचा ऐतिहासिक आढावा घेणारा हा लेख. ब्रिटीशपूर्व काळातील शेतीचं स्वरूप, ब्रिटीश काळातील शेती, हरितक्रांती या मुद्द्यांवर चर्चा करत आजच्या परिस्थितीत शेतीसमोरील आव्हाने काय आहेत हे या लेखात विस्तृतपणे मांडलं आहे. महत्त्वाचं म्हणजे शेतीच्या प्रश्नांची उत्तरे नव्या शास्त्रीय पर्यायांमधून कशी मिळू शकतील याची मांडणी या लेखात केली आहे.

शेतीचा शोध हा शिकार व अन्नसंकलनासाठी वणवण भटकण्यापेक्षा एका जागीच अन्न मिळविण्याचा मानवी इतिहासातील महत्त्वाचा टप्पा होता. एका परीने मानवाच्या स्थिर जीवनाची ती सुरवात होती. या शोधाचे मानवी जीवनावर सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक अंगाने व्यापक परिणाम झालेत.

शेतीचे उत्पत्तीस्थान

जगात शेतीचा शोध साधारणत: १०,००० वर्षांपूर्वी प्रथम मध्यपूर्वेतील आताचे इस्त्राईल, पँलेस्टाईन, जॉर्डन, लेबनॉन, सिरीया, तुर्कस्थान, कुवेत व इराक या देशांमधील लगतच्या प्रदेशांचा मिळून जो अर्धचंद्राकृती आकार होतो त्या सुपीक प्रदेशात (FERTILE CRESCENT) लागला. अर्थात प्रत्यक्ष शेतीला सुरवात करण्याआधीही माणूस (खरे तर स्त्रिया) त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील वनस्पतींचे निरीक्षण करून त्यातील खाद्ययोग्य अन्नाचे व विशेषत: बियाणांचे निरीक्षण करीत होता. पोषणमूल्य असलेली बियाणे राखून ठेवून ती दुसर्‍या वर्षीच्या हंगामात पेरता येऊ शकतात व एका बियाणाच्या पेरणीतून उगवलेल्या ताटातून कापणी किंवा तोडणीनंतर कितीतरी जास्त बियाणे गोळा करता येतात हे समजल्यावर शेतीतील अन्ननिर्मितीचे तंत्रच त्याच्या हाती आले. सुरवातीच्या काळात शेतीतंत्र हे अतिशय प्राथमिक अवस्थेत होते. हातानेच शेताची मशागत, पेरणी व इतर कामे व्हायची. पुढे गुरांच्या मदतीने शेती व्हायला लागली.



Discussion

No Comment Found