1.

Bull Cart essay in Marathi

Answer»

ANSWER:

बैलगाडी ही बैलाचा वापर करून ओढली जाणारी गाडी आहे.स्वयंचलित वाहने येण्यापूर्वी,याचा वापर शेतमाल वाहण्यासाठी सहसा करण्यात येत होता.पूर्वीच्या काळी लग्नाला वऱ्हाड घेऊन जाण्यासाठी बैलगाडीचा वापर होत असे. अद्यापही बऱ्याच ठिकाणी शेतीमाल वाहण्यासाठी बैलगाडीचा वापर होतो.

बैलगाडीला एक किंवा दोन बैल जुंपलेले असतात. भारतीय जातीच्या बैलाला ज्याच्या पाठीला वशिंड असते असे बैल पारंपारिक गाडीला जोडता येतात. बहुतेकदा बैलगाडी लाकडी असते. बर्फ वाहून नेण्यासाठी जी बैलगाडी वापरतात ती मात्र वेगळ्या प्रकारची असते. त्यासाठी बहुतेकदा कमी उंचीची, कठडा नसणारी लांब रुंद फलाट असणारी, व चाकाला टायर असणारी अशी गाडी वापरतात

बैल हा एक वळू या पाळीव पशुचे खच्चिकरण केलेला प्राणी आहे. हा मुख्यतः शेतीच्या कामांसाठी वापरला जातो.नांगरणी, खळ्यावरचे धान्य तुडविण्याचे काम,एखादे खेचकाम जसे मोट ओढणे, बैलगाडी ओढणे इत्यादी कामासाठी याचा वापर करतात.बैलगाड्या माल वाहतुकीबरोबर लोकांच्या वाहतुकीसाठी पण वापरतात. बैलानी ओढलेली गाडी म्हणजेच बैलगाडी होय. बैल हा अनेक कामात सहसा जोडीनेच वापरल्या जातो.तेंव्हा त्यास 'बैलजोडी' म्हणतात.बैल हा शेतकऱ्याचा मित्र आहे .एक वाक्य असा आहे की बैलगाड़ी ला पुढुन ईश्वरने व मागुन मानसाने तयार केलेले आहे।



Discussion

No Comment Found