1.

Composition on majhi avadthi prani

Answer» E is your ANSWER माझा आवडता प्राणी हा तसा नेहमी विचारला जाणारा निबंधाचा विषय. यामध्ये तशी मोठी यादी आहे, हत्ती, ससा, गाय, मांजर, वाघ, सिंह, गाय, बैल आदी. आजकाल तुम्हाला इंटरनेट वर माझा आवडता प्राणी या विषयावर खूप सारे निबंध मिळतील, त्यांत काही चांगले सुद्धा आहेत. आम्ही इथे या विषयावर थोडा वेगळा निबंध देण्याचा प्रयत्न केलं आहे. आशा करतो तुम्हाला आवडेल. इथे आम्ही कुत्रा या प्राण्याबद्दल लिहिले आहे, जर तुमचा आवडता प्राणी कोणी दुसरा असेल तर, या निबंधातून एक अंदाज घ्या आणि तुमच्या आवडत्या प्राण्याबद्दल लिहा.माझा आवडता प्राणी कुत्रा – मराठी निबंधतसे मला प्राणी फारसे आवडत नसत, मला प्राण्यांची थोडी भीतीच वाटत असे. पण आता एका प्राण्याची मला आजिबात भीती वाटत नाही तो म्हणजे, आमचा “ब्रूनो”.ब्रूनो हा आमचा माझा पाळीव कुत्रा आहे. तो जेमतेम १ वर्षांचा आहे,पण तो वाटतो ३ ते ४ वर्षांचा. मागच्या वर्षी माझ्या घराशेजारच्या परिसरात त्याचा जन्म झाला. दुर्देवाने काही दिवसात त्याच्या आईला एक गाडीने उडवले. बिचारी दोन पिल्ले आई शोधात होते. मला तसे प्राणी आवडत नसत, पण त्या दोन पिल्लांची अवस्था बघून मला आणि माझ्या मित्राला दया आली. आम्ही दोघांनी एक एक पिल्लू घरी आणले.हलका तांबूस रंग, टपोरे डोळे, बघता क्षणीच तो घराच्या सर्वाना आवडला. त्याच्या ब्रूनो नावामागे हि एक गम्मत आहे. घरी आल्यावर त्याचे काय ठेवणार यावर चर्चा सुरु झाली. कोणी म्हणे टॉमी, तर कोणी म्हणे टायगर, मला काहीतरी वेगळं नाव ठेवायचे होते. एके दिवशी मी माझ्या एका आवडत्या इंग्रजी गायकाचे गाणे ऐकत होतो, त्याचे नाव आहे “ब्रूनो मार्स”. त्या क्षणी मी ठरवले, त्या चिमुकल्याला मी ब्रूनो म्हणणार. आई, बाबा, आजीला सुरवातीला थोडे अवघड वाटले, पण नंतर सवय झाली.सुरवातीला त्याची सर्व काळजी मी घेत असे. त्याला अंघोळ घालणे, खायला घालणे, खेळवणे, डॉक्टरकडे घेऊन जाणे आदी. काही महिन्यांत मात्र सगळ्यांना त्याचा लळा लागला. आता आम्ही सर्व मिळून त्याची काळजी घेतो.मागच्या सुट्टी मध्ये मी कुत्रा आणि मानव यांच्यातल्या खास नात्याबद्दल वाचायला लागलो. मला असे कळले की, दुसऱ्या कुठल्याही प्राण्यापेक्षा कुत्राचे आणि माणसाचे दृढ आणि विश्वासाचे असते. या नात्याचा इतिहास शेकडो वर्षांचा आहे. कुत्रे अगोदर जंगलात राहत असत, म्हणूनच त्यांना जंगली कुत्रे म्हणत. अजूनही काही कुत्रांच्या जाती कोल्हे आणि लांडग्यांसारख्या दिसतात. हळू हळू मानवाने कुत्र्यानं पाळीव बनवण्याच्या पद्धती शोधून काढल्या.हि पाळीव कुत्री मानवाच्या घराची राखण करत, शिकारी प्राणी आले की ते आपल्या मालकाला सावधान करत. मग ते मानवाला शिकारी मध्ये सुद्धा मदत करू लागले. कुत्रांची एक खासियत जी मनुष्याला उपयोगी पडते ती म्हणजे त्याची हूंगण्याची क्षमता. कुत्रे वासाचे विश्लेषण मानवापेक्षा ४० पटीने जास्त चांगल्या प्रमाणाने करतात. म्हणूनच गुन्हेगार किंवा बॉम्ब शोधण्यात त्यांची मदत घेतली जाते.शेकडो वर्षांच्या अश्या प्रवासानंतर कुत्रा हा आता पाळीव प्राणी झाला आहे. आता जंगली कुत्रे खूप क्वचितच पाहायला मिळतात. आता कुत्रा आणि मानवाचे नाते हे आणखी प्रबळ झाले आहे. आता आपण कुत्रा घर राखण्यासाठी घेत नाही. आता लोक कुत्र्यांना, मांजरांना अगदी मित्रच नव्हे तर मुलांसारखे मानतात. आजकालच्या स्वतंत्र जीवनशैलीमध्ये लोक एकटे एकटे पडतात, अश्या कुत्रा, मांजरीसारखे प्राणी त्यांना एक मानसिक आधार देतात, त्यांना एक विरंगुळा देतात.मला हे सारे विचित्र वाटायचे, पण आता एक वर्षांनंतर कळते की ब्रुनो हा आता माझा फक्त मित्र झाला नाही तर, आमच्या कुटुंबाचा जणू एक सदस्यच झाला आहे.make SURE it BRAINLIEST PLEASE


Discussion

No Comment Found