1.

Delightful evening essay in Marathi

Answer»

ANSWER:

शहरांमध्ये हल्ली जागाच उरली नाही आहे म्हणून गर्दीपासून लांब मी दरवर्षी गावाला जातो आणि १-२ महिने मस्त आराम करतो. ना सकाळी लवकर उठायचे, ना कसली कामे करायची, जेवून निघायचे घरा बाहेर ते थेट संध्याकाळी घरी परत. माझे मित्र आणि मी गावाला खूप मजा करत.

सांगायची गोष्ट म्हणजे मी आणि माझे मित्र एकदा फिरता फिरता, आमचे दुपारचे जेवण आटपून, आणि दुपारी आंब्याच्या झाडाखाली मस्त आराम करून, संध्याकाळी सहाच्या सुमारास एका मोठ्या शेताकडे पोहोचलो. त्या शेताचा आकार अवाढव्य होता. त्या शेताच्या किनाऱ्याला चारी बाजूला मोठमोठाली झाडे होती. सूर्य पंधरा मिनिटानंतर मावळणार होता व आकाशाचा रंग नारंगी निळा रंगाचा होता आणि भाताची शेती तिकडे केली होती. सगळीकडे हिरवळ पसरली होती. संध्याकाळची वेळ असल्यामुळे अंधार पडत होता व त्यामुळेच सगळे पक्षी आपापल्या घरट्यात पुन्हा येत होते. हे बघून माझे मन हर्षित झाले. शेतामध्ये १५ ते २० लोक भाताची लागवड करत होती. पण जसा जसा अंधार पडू लागला तसेच हे लोक देखील आपल्या घरी गेले. पंधरा मिनिटे नंतरच सूर्य डोंगराच्या मागे जाऊन मावळला. लगेच अंधार पडला आणि आम्हाला काजवे दिसू लागले. शंभर ते दीडशे काजवे त्या आंब्याच्या झाडा होते उडू लागले व त्यांच्या रोशनी मुळे झाड लख्ख प्रकाशित झाले.

हे संध्याकाळचे दृश्य नयनरम्य होते.



Discussion

No Comment Found