1.

दसरा माहिती, निबंध, भाषण मराठीमध्ये

Answer»

ANSWER:

दसरा हा सण सर्व भारतात लोकप्रिय आहे.आश्विन शुद्ध दशमीला हा सण येतो.या सणाला विजयादशमी असेही म्हणतात.

दसऱ्याच्या आधी नऊ दिवस 'नवरात्री' साजरी करतात.दुर्गादेवीने महिषासुराला या दिवशी मारले होते.याच दिवशी रामाने रावणाला मारले.अशा कथांमुळेच दसरा हा विजयाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो.

दसऱ्याला रावणाचा पुतळा करून जाळतात.या दिवशी सर्वजण एकमेकांना आपट्याची पाने देतात.आपले प्रेम व्यक्त करतात,शुभेच्छा देतात.

दसरा हा दिवस शुभ मानला जातो.या दिवशी लोक सोने,चांदी,घरासाठी लगणाऱ्या गोष्टींची खरेदी करतात.या दिवशी सुरु केलेली कामे यशस्वी होतात,अशी लोकांची श्रद्धा आहे.

दसरा हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

Explanation:



Discussion

No Comment Found