InterviewSolution
| 1. |
दूरचित्रवाणी, दूरदर्शन, शाप की वरदान, माहिती, निबंध, भाषण |... |
|
Answer» आजच्या युगात दूरदर्शन ही एक आवश्यकता बनली आहे.दूरदर्शनामुळे आपल्याला जगभरच्या बातम्या घर बसल्या समझतात. वेगवेगळ्या देशांबद्दल माहिती मिळते.विविध खेळांचे थेट प्रसारण पाहायला मिळते. यावर आपण वेगवेगळे नाटक व सिनेमा पाहू शकतो.नॅशनल जॉग्रफिक आणि डिस्कवरी अशा वाहिन्यांमुळे आपल्याला जगाबद्दल माहिती मिळते.दूरदर्शनामुळे आपल्याला नवनवीन चित्रपट व गाणि पाहायला मिळतात,ज्यामुळे आपले मनोरंजन होते.दूरदर्शनामुळे आपला एकटेपणा दूर होतो. पण दूरदर्शनाचे तोटेही आहेत.दूरदर्शन जास्त वेळ बघितल्यामुळे आपल्या डोळ्यांची दृष्टी खराब होण्याची भीती असते.लहान मुले त्यांचा अभ्यास विसरून दूरदर्शन पाहत राहतात,त्यामुळे त्यांचा अभ्यास होत नाही व फक्त एका जागेवर बसून असल्यामुळे काही शारीरिक व्यायामसुद्धा होत नाही.दूरदर्शनावरील काही हिंसात्मक आणि गुन्हे दाखवणाऱ्या कार्यक्रमांमुळे लोकांच्या मनावर नकारात्मक प्रभाव पडतो. प्रत्येक गोष्टीचे फायदे व तोटे असतात,तसेच दूरदर्शनाचेही आहेत. आता हे आपल्यावर आहे की आपण त्याचा वरदान म्हणून उपयोग करतो की शाप म्हणून. Explanation: |
|