InterviewSolution
| 1. |
एक थोर विचारवंत – महर्षी अण्णासाहेब धोंडो केशव कर्वे मराठी... |
|
Answer» महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म महाराष्ट्रामधील,रत्नागिरी जिल्ह्यातील शेरवली गावात १८ एप्रिल,१८५८ रोजी झाला.ते एक श्रेष्ठ समाजसुधारक होते.ते महर्षी अण्णासाहेब कर्वे या नावाने ओळखले जात असे. १८८१ या वर्षी ते मैट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.त्यानंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज मध्ये ते गणिताचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले.विधवा-पुनर्विवाह आणि महिलांचे शिक्षण व त्यांच्या हक्कांसाठी त्यांनी त्यांचे जीवन व्यतीत केले. हिन्दू समाजात चालू असलेली अस्पृश्यता आणि जातिव्यवस्थेच्या विरुद्ध ते लढले. विधवा पुनर्विवाहसाठी त्यांनी 'विधवा विवाहोत्तेजक' मंडळाची स्थापना केली.त्यांनी महिला विद्यालय,निष्काम कर्म मठ,कन्या शाळा,समता संघ सुद्धा स्थापित केले.त्यांनी भारतातील पहिले महिला विद्यापीठ म्हणजेच एसएनडीटी विद्यापीठाची स्थापना केली. त्यांनी मराठीत 'आत्मवृत्त' नावाचे पुस्तक आणि इंग्रजीत 'लुकिंग बैक' नावाचे पुस्तक लिहिले.त्यांच्या कामगिरिसाठी त्यांना पद्मविभूषण व भारतरत्न हे पुरस्कार मिळाले. वयाच्या १०४ व्या वर्षी ९ नोव्हेंबर,१९६२ रोजी पुणे येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Explanation: |
|