InterviewSolution
| 1. |
एका फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त, आत्मकथा, मनोगत – मराठी... |
|
Answer» ⠀⠀⠀⠀⠀⠀ फाटक्या पुस्तकाचे मनोगत बाळांनो! इकडे, माझ्याकडे पाहा. मी इथे आहे. बघा, अजून लक्ष गेले नाही ना? हेच माझे दु:ख आहे. बाळांनो, मी पुस्तक बोलत आहे! मी एक फाटके पुस्तक आहे. माझ्याकडे कुणीच बघत नाही, याला एक कारण आहे. तुम्हांला कोणालाच हल्ली वाचनाची आवड राहिलेली नाही. सगळेजण दूरदर्शन वा संगणक यांच्यातच गुंतलेले असतात. तसेच, माझी ही जीर्ण अवस्था झालेली आहे, म्हणूनही कोणी माझ्याकडे बघत नाही. माझी ही जीर्ण अवस्था कोणी केली? तुम्हीच ना? तुम्ही मला कधी प्रेमाने वागवलेच नाही. तुम्ही मला कुठेही फेकत होता. तुम्ही माझी पाने दुमडली. पानांवर काहीबाही लिहून ठेवले. त्यामुळे माझी ही अवस्था झाली. पण मी तुम्हां माणसांसाठी काय काय केले! मी तुम्हांला वाचायला शिकवले. तुम्हांला अनेक प्रकारची माहिती सांगितली. खूप गोष्टी सांगितल्या. खूप कविता, गाणी दिली. पण तुम्ही हे सारे विसरलात. आता तरी लक्षात घ्या. मला व माझ्या बांधवांना जवळ घ्या. तुमचे जीवन सुखी होईल. |
|