InterviewSolution
| 1. |
ग्रामीण जीवनातील समस्या – मराठी निबंध, भाषण, लेख, माहिती |
|
Answer» ANSWER: आजच्या शतकातील सर्व समस्यांपैकी एक मोठी समस्या म्हणजे वाढते शहरीकरण आणि ओस पडत चाललेली खेडी. या समस्येचे मूळ शोधले असता लक्षात येते की ग्रामीण भागात असलेल्या समस्या हे वाढत्या शहरीकरणाचे खरे कारण आहे. ग्रामीण भागात लोकांचे पोट हे शेतीवर अवलंबून असते. पाऊस व्यवस्थित पडला तरच शेतीतून पीक चांगले येते. त्यामुळे हा व्यवसाय फार जिकीरीचा आहे. अजूनही शेतकऱ्यांसाठी असलेल्या सरकारी योजना त्यांच्यापर्यंत वेळेवर पोहोचत नाहीत. नवीन तंत्रज्ञान महागडे असल्याने गरीब शेतकऱ्यांना ते परवडत नाही. काही ठिकाणी प्यायला पाणी नाही. गावात उच्च शिक्षणाची सोय नाही. तर काही ठिकाणी सुसज्ज दवाखाने नाहीत. अनेक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी ग्रामीण भागातील जनतेला शहरांकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे ते स्थलांतराचा पर्याय स्विकारतात. परंतु यामुळे मूळ समस्या मागेच राहते आणि शहरीकरणासारखी नवीन समस्या उद्भवते. त्यामुळे इतर समस्या टाळायच्या असतील तर आधी ग्रामीण भागाचा विकास करणे आवश्यक आहे.
|
|