|
Answer» सकाळी बाहेरगावी असलेल्या मामेभावाचा फोन आला होता. तो सांगत होता त्यांच्या गावात चालु असलेल्या जत्रे विषयी आणि म्हणत होता तु पण ये ना इकडे खुप मज्जा येईल. त्यावेळेस मी बोलुन गेलो “मला काय पंख आहेत का? कधीही उठाव आणि उडत उडत कुठेही पोहोचावं!” त्याचा फोन ठेवला आणि मना मध्ये विचारचक्र सुरु झाले, खरंच मला पंख असते तर? सगळ्यांत पहिल्यांदा म्हणजे कुठेही जाण्यासाठी जे आई-बाबांवर अवलंबुन रहावे लागते ते नाहीसे होईल. क्धीहि, कुठेही जावेसे वाटले तरी ते सहज शक्य आहे नाही का? पंख पसरले, आकाशी भरारी घेतली आणि झालो हवेच्या लाटेवर स्वार. रस्त्यावरील वाहतुकीचा, गर्दीचा त्रास नाही, वाहनाची किंवा वाहनचालवण्याच्या परवान्याची आवश्यकता नाही की अपघाताची भीती नाही. रस्त्यावरील घाण, कचरा, दुर्गंधी, खड्डे हे सगळे पादचाऱ्यांसाठी, हवेत उडणाऱ्याला त्याची काय पर्वा? अवकाशातुन ही धरणी सुंदर, हिरवीगारच भासते. जमीनीवर भासणाऱ्या उत्तंग इमारती आकाशातुन किती छोट्या वाटतील? कधी या झाडावर तर कधी त्या झाडावर. ना राज्यांची बंधन ना देश्याच्या सिमा. मनात आलं तर कधी एका देशात तर कधी दुसऱ्या. कित्ती मज्जा!! शब्दशः सांगायचे झाले तर “वसुधैव कुटुंबकम”, हे विश्वची माझे घर.
|