1.

Heya mates!✌☺❤ ♥ Write a dialogue between a plastic bag and a man in Marathi. =============================Answers expected from Marathi people✌✌

Answer»

- ______________________________( दृश्य : - प्लास्टिक बॅग रडत होती त्या आवाजामुळे विराज तिकडे जातो)विराज:- (आश्चर्यचकित होऊन निरीक्षण करू लागला) (बॅगच्या जवळ जाऊन) अरे बापरे ! तु ....तु....प्लास्टिक बँग रडत आहेस ! काय झाले ?प्लास्टिक बँग:- काय सांगू आज काल मला कोणीही जवळ करत नाही (वापरत नाही) एक दिवस असा होता की माझ्या शिवाय कोणाचे पान ही हलत नव्हते. आणि आज सगळेच मला दूर ढकलत आहेत. असे का घडले ?विराज:- (हसत) अरेरे! हे तर खुपच वाईट झाले ! पण तुला माहित आहे का ? तुझा वापर केला तर आम्हाला म्हणजेच संपूर्ण मानव जातीला प्लास्टिकचा भस्मासूर गिळंकृत करेल.प्लास्टिक बॅग :- (प्रश्नार्थक नजरेने बघत) ते कसे बरे?विराज:- प्लास्टिक वर नष्ट करण्यासाठी प्रक्रिया करताच येत नाही. पाण्यामध्ये टाकल्यास पाणी प्रदूषण, जाळून टाकल्यास वायुप्रदूषण, जमिनीत गाडून टाकले अथवा पुरल्यास मृदा प्रदूषण होते. तुझा वापर मानवजातीलाच नव्हे तर संपूर्ण सृष्टीला हानीकारक आहे.प्लास्टिक बॅग:- (रडत) यामुळेच महाराष्ट्र सरकारने जून 2018 पासून प्लास्टिक बंदी केली आहे. प्लास्टिक वापरण्यावर दंड भरावा लागेल असा नियम लागू केला आहे.प्लास्टिक बँग :- (चिंतित होऊन) आता माझे कसे होणार?विराज:- महाराष्ट्र सरकारच्या या नियमामुळे व प्लास्टिक बंदी मुळे थोडासा त्रास सहन करावा लागेल पण यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास थोडीशी तरी मदत होईल.विराज:- (घाईत) चल! मी निघतो आता बाजारात जाऊन कापडी बॅग (पिशवी) खरेदी करायची आहे.______________________________



Discussion

No Comment Found