| 1. |
I) पोषण कशाला म्हणतात? |
|
Answer» पोषण : एककोशिकीय (एकाच पेशीच्या बनलेल्या) जीवांपासून ते जटिल अशा स्तनी प्राण्यांपर्यंतच्या सर्व प्राण्यांना व वनस्पतींना त्यांच्या क्रियाशील जीवनासाठी आणि यशस्वी प्रजोत्पादनासाठी वा पुनरुत्पादनासाठी काही खाद्य पदार्थ किमान स्वरूपात व प्रमाणात लागतात. हे पदार्थ काय आहेत? त्यांचे कार्य असे होते? या पदार्थांचे प्रमाण कमी वा जास्त झाल्यास काय परिणाम होतात? पोटात गेल्यावर त्यांचे काय होते? इत्यादी तत्संबंधी प्रश्नांशी पोषण निगडित आहे. ‘अत्राचे शास्त्र व त्यातील पोषक घटक आणि त्यांचा आरोग्याशी असणारा संबंध’ अशी पोषणाची व्याख्या करता येईल. ⇨जीवरसायनशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान आणि एंझाइमविज्ञान (सजीव कोशिकांमध्ये तयार होणाऱ्या व रासायनिक विक्रिया घडविण्यास मदत करणाऱ्या प्रथिन संयुगांचे विज्ञान) ह्या शास्त्रांशी पोषणाचा संबंध येतो. पोषण आणि ही शास्त्रे एकमेकांत इतकी गुंफलेली आहेत की, काही वेळा त्यांच्यातील फरक दाखविणे शक्य होत नाही. विविध प्रकारच्या प्रत्येक सजीवाच्या पुढील दोन पोषणविषयक गरजा असतात : (१) ज्यांच्यापासून ऊर्जा उत्पत्र होते असे पदार्थ अन्न म्हणून खाणे व (२) ज्या पदार्थांचे सजीवांच्या क्रियात्मक वा संरचनात्मक गरजा भागविणे हे प्राथमिक कार्य आहे असे पदार्थ. काही पदार्थ दोन्ही प्रकारच्या गरजा भागवू शकतात. एका जातीतील जीवांना लागणाऱ्या पोषणविषयक पदार्थांचे प्रमाण दुसऱ्या जातीतील जीवांच्या बाबतीत जास्त असेल, कमी असेल वा निराळे असेल. काही जीव काही वेळा हे पदार्थ इतर पदार्थांपासून तयार करू शकतात. त्यामुळे एका जातीबद्दलच्या पोषणविषयक ज्ञानावरून दुसऱ्या जातीच्या जीवासंबंधीचे पोषणविषयक अंदाज बांधणे कठीण जाते. |
|