1.

जंगल भ्रमंती यावर तुमचे मत लिहा​

Answer»

धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे.

ताडोबा हे वाघांसाठी प्रसिद्ध असलेले जंगल आहे. आर्द-पानगळीच्या या जंगलात बांबू, ऐन, मोह, कांडेळ, धावडा, काटेसावर आदी प्रमुख वृक्ष आहेत. वाघांबरोबरच बिबटय़ा, सांबर, चितळ, वानर, अस्वल, गवा, रानडुक्कर, नीलगाय आदी प्रमुख प्राणी इथे आढळतात. याशिवाय २५० हून अधिक प्रजातीच्या पक्ष्यांचे इथे दर्शन घडते. अशा या जंगलाच्या अभ्यास सहलीचे ‘निसर्ग टूर्स’ तर्फे २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत आयोजन केले आहे.



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions