1.

Kalpanavistar likhiye : - समयदान हेच श्रेष्ठ दान!​

Answer»

यदान हेच श्रेष्ठ दान!आपल्याला नेहमी सांगितले जाते की, दानात मोठे पुण्य आहे. म्हणून आपल्या प्रत्येक सण-उत्सवात, व्रत-वैकल्यात दानाला स्थान असते.फार पूर्वीपासून आपल्याकडे वित्तदान, गोदान, भूदान, अन्नदान, वस्त्रदान करण्याची पद्धत होतीच. आधुनिक काळात आपल्याला दानाचे विविध मार्ग उपलब्ध झाले आहेत. ज्ञानदान, रक्तदान, गात्रदान (अवयवांचे दान), नेत्रदान आणि अगदी मृत्यूनंतर देहदानही. या सर्व दानांच्या मागे दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याचीच भावना असते. या सर्व दानांहून सोपे आणि कुणासही सहज करता येईल, असे दान म्हणजे समयदान, समय म्हणजे वेळ. ही गोष्ट अनमोल आहे. कारण गेलेला वेळ परत मिळत नाही. म्हणून आपल्याला उपलब्ध झालेला वेळ हा सत्कारणी लावावा. व्यर्थ घालवू नये. दिवसातले काही तास तरी दुसऱ्यांसाठी खर्च करावेत. या व्रताची सुरुवात आपल्याला अगदी स्वत:पासून करता येईल. आपली आई घरासाठी कष्टत असत. आपण जर एखादा तास घरातले काम केले, तर तिला विसावा मिळेल आणि विशष आनंद होईल. आपल्यालाही दुसऱ्याला मदत करण्याची सवय लागेल. हेही नसे थोडक!



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions