InterviewSolution
| 1. |
कोशवाङमयातून कोणती माहिती मिळते |
|
Answer» कोशवाङ्मय कोश हा वाङ्मयाचा एक प्रकार आहे. कोश म्हणजे शब्दांचा, विविध माहितीचा वा ज्ञानांचा केलेला व्यवस्थित संग्रह. या वाङ्मयप्रकारास संस्कृतमध्ये कोश वा कोष असे म्हणतात. ‘संग्रह करणे’ या अर्थी असलेल्या कुश् वा कुष् या धातूपासून कोश वा कोष शब्द झाला असून संग्रह वा संचय असा, किंवा संग्रहाचे स्थान वा आधार असा त्याचा मूळ अर्थ आहे. व्यक्तीच्या वा राज्याच्या धनसंचयास कोश असा शब्द संस्कृतमध्ये रूढ आहे. तसेच तलवार, सुरा इ. वस्तू सुरक्षित ठेवण्याचे म्यान वगैरे साधन, असाही संस्कृतमध्ये कोश शब्दाचा अर्थ आहे. पदार्थांचा, वस्तूंचा, धनाचा, शब्दांचा, ज्ञानाचा वा कशाचाही संग्रह किंवा संग्रहाचे स्थान म्हणजे कोश होय. साहित्याच्या संदर्भात शब्दसंग्रह वा ज्ञानसंग्रह ज्यात केलेला असतो, असा ग्रंथ म्हणजे कोश होय. लिखित भाषेचा व ज्ञानाचा वाङ्मय वा साहित्य या स्वरूपात विशेष विस्तार होऊ लागला, म्हणजे कोशवाङ्मय साहित्याच्या अध्ययनाचे साधन म्हणून आवश्यक ठरते. साहित्यातील शब्दसंख्या मोठी झालेली असते किंवा सारखी वाढत असते, म्हणून त्या त्या भाषेतील शब्दांचा एकत्र व्यवस्थित संग्रह केलेला असतो; शब्दाचे अर्थ नीट रीतीने समजतील अशा पद्धतीने आणि त्या त्या भाषेतील वा अन्य भाषेतील शब्दांचे अर्थ समजावे, अशी त्यांची मांडणी केलेली असते. ज्ञानाच्या भिन्न भिन्न शाखांची निर्मिती होऊ लागली वा विविध प्रकारची माहिती वाढली, म्हणजे थोडक्यात विविध माहितीचा वा ज्ञानांचा संग्रह करण्याची आवश्यकता निर्माण होते; ज्ञानकोश तयार होऊ लागतात. त्यांस विश्वकोशही म्हणतात. |
|