1.

माझा आवडता खेळ- कबड्डी मराठी निबंध, भाषण, लेख

Answer»

ANSWER:

कबड्डी हा माझा आवडता खेळ आहे.आम्ही मित्र-मैत्रिणी हा खेळ खेळतो.सगळ्यांना हा खेळ आवडतो.

कबड्डी हा खेळ मैदानात खेळतात.या खेळासाठी पैसे लागत नाही.कोणत्याही वस्तू आणाव्या लागत नाही.सर्व मुले हा खेळ खेळू शकतात.

कबड्डी या खेळात दोन संघ असतात.प्रत्येक संघात सात खेळाडू असतात.मैदानाचे दोन समान भाग केले जातात, मध्ये एक रेखा आखली जाते.हा खेळ २०-२० मिनिटांच्या दोन भागांत खेळला जातो. प्रत्येक संघातील एक खेळाडू मध्य रेखा ओलांडून इतर संघाच्या सदस्यांना स्पर्श करून त्यांना खेळातून बाद करून परत धावत येतो. जितके अधिक विरोधी खेळाडूंना स्पर्श केले जाते, तेवढे अधिक गुण मिळतात परंतु विरोधक संघ शारीरिकदृष्ट्या त्याला दुसऱ्या बाजूला जाण्यापासून रोखू शकतो,त्यावेळी खेळाडूला एकही गुण मिळत नाही.

या खेळामुळे आपण चपळ बनतो.आपल्याला खूप व्यायाम मिळतो.मित्रांबरोबर खेळण्याचा आनंद मिळतो.या सगळ्या गोष्टींमुळे मला कबड्डी हा खेळ आवडतो.

Explanation:



Discussion

No Comment Found