InterviewSolution
| 1. |
माझा आवडता संत कवयित्री जनाबाई – मराठी माहिती, निबंध... |
|
Answer» माझ्या आवडत्या संत आहेत संत जनाबाई.संत जनाबाई या महाराष्ट्रामधील एक प्रसिद्ध संत कवियत्री होत्या.त्यांचा जन्म १२५८ मध्ये परभणी जिल्ह्यातील,गंगाखेड गावात झाला.त्यांचे वडील दमा हे वारकरी होते व आई करुंड भगवद्भक्त होती.ते दोघे विठ्ठलाचे भक्त होते.आई वारल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना पंढरपुरातील संत नामदेवांचे वडील दामाशेट यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले.लहानग्या नामदेवांना त्यांनी सांभाळले आणि आयुष्यभर त्या त्यांच्या दासी म्हणून राहिल्या.त्या विठ्ठलांना आई मानायच्या. जनाबाईंनी ३४० हून अधिक भक्तीगीते, अभंग रचली. त्यांच्या कवितांमध्ये त्याग, सहिष्णुता, आपुलकी, प्रामाणिकपणा, आत्मसमर्पण आणि स्त्री भावना दिसून येतात.त्यांचे काही गाणी त्यांच्या सहकारी वारकरी आणि विष्णूच्या वेगवेगळ्या अवतारांच्या जीवनाविषयी सांगतात,त्यांच्यातील सर्वात विशिष्ट गाणी म्हणजे विठ्ठळासोबत त्यांचे वैयक्तिक नातेसंबंध सांगणारी गाणी. १३५० मध्ये,पंढरपुरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Explanation: |
|