InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
माझे आवडते शिक्षक मराठी निबंध, भाषण, लेख |
|
Answer» ANSWER: आमच्या शाळेतील सौ. पाटील या माझ्या आवडत्या शिक्षिका आहेत. त्या आम्हाला मराठी हा विषय शिकवतात. त्या खूप प्रेमळ आहेत. अत्यंत कठीण धडा किंवा कविता त्या आम्हांला फार सोप्या भाषेत सांगतात. त्यांचे वाचन अफाट आहे. त्या आम्हाला नवनवीन गोष्टी सांगून आमच्यामध्ये नैतिकता रूजावी यासाठी प्रयत्न करतात. गरजू विद्यार्थ्यांना त्या नेहमी मदत करतात. अशा आमच्या या शिक्षिका खरंच आदर्श आहेत आणि मला त्या फार आवडतात. Explanation: |
|