InterviewSolution
| 1. |
माझी आजी – मराठी निबंध, भाषण, लेख |
|
Answer» माझ्या अजीचे नाव आनंदीबाई जोशी आहे.ती ७६ वर्षांची आहे.ती नेहमी हसतमुख असते.रोज सकाळी लवकर उठते व सगळ्यांच्या आधी अंघोळ करते.मग ती व्यायाम करते. माझ्या सगळ्या गोष्टींकडे आजीचे लक्ष असते.ती मला वेळेवर अभ्यास व इतर कामे करायला सांगते.जेवण वेळेवर घ्यायला लावते. मला घरी यायला उशीर झाला की,तिला फार काळजी वाटते. कधी कधी मी संध्याकाळी आजीबरोबर फिरायला जाते.तिला टीव्ही पाहायला फार आवडते.तिची डोळ्यांची दृष्टी या वयातही चांगली आहे.तसेच तिची स्मरणशक्ति देखील चांगली आहे. मी आजीला माझ्या मनातलं सगळे काही सांगते.घरी आलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींना ती खाऊ देते.त्यांनासुद्धा ती खूप आवडते.माझी आजी माझे खूप लाड करते.मला माझी आजी खूप खूप आवडते. Explanation: |
|