1.

मानवी उत्क्रांती जे सादरीकरण in marathi​

Answer»

मानवी उत्क्रांती हा केवळ जीववैज्ञानिक अथवा तत्त्वज्ञ यांनाच नव्हे, तर सर्वसामान्यांनादेखील कुतूहल वाटणारा विषय आहे. मानवजातीचा उगम कसा आणि कुठून झाला, तसेच मानव इतर प्राण्यांप्रमाणेच आहे, की त्याच्या अस्तित्वाला काही निराळे महत्त्व आहे, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे प्रयत्न जीवविज्ञान व तत्त्वज्ञानात किमान तीन हजार वर्षे केले जात आहेत. अनेक धर्मवेत्ते आणि तत्त्वज्ञांनी मानवाचा उगम व त्याच्या अस्तित्वाचा अर्थ याबद्दल विचार मांडले आहेत. यांशिवाय जगभरातल्या जवळजवळ सर्व जमातींच्या मौखिक परंपरा व मिथ्यकथांमध्ये विश्वाच्या व पर्यायाने मानवाच्या उत्पत्तीसंबंधी स्पष्टीकरण देण्याचे प्रयत्न झालेले आढळतात.ग्रीक गणितज्ञ पायथॅगोरसचा शिष्य झेनोफानेस (इ.स.पू. पाचवे शतक) याने सिसिलीमधील सिराक्यूस आणि माल्टा येथील खाणींमध्ये माशांचे जीवाश्म पाहिले. हे जीवाश्म पूर्वी कधीतरी अस्तित्वात असणाऱ्या प्राण्यांचे पुरावे असतात आणि त्यांच्यामध्ये हळूहळू बदल घडत गेले, असे अनुमान झेनोफानेस याने काढले होते; तथापि प्लेटो, ॲरिस्टॉटल आणि त्यांच्या पठडीतील ग्रीक तत्त्वज्ञांना सजीवांचे जीवाश्म होतात, ही संकल्पनाच मान्य नव्हती. कारण ग्रीक विचारवंतांपासून ते आधुनिक काळापर्यंत प्रामुख्याने सर्व विश्व स्थिरावस्थेत असते, अशा स्वरूपाच्या प्लेटोप्रणीत सत्त्ववादी (ESSENTIALISM) तत्त्वज्ञानाच्या प्रभावाखाली व विश्वाच्या उत्पत्तीला कोणी निर्माता कारणीभूत असल्याच्या कल्पनेला चिकटून असल्याने उत्क्रांतीच्या संकल्पनेचा विकास खुंटला होता. तथापि एकोणिसाव्या शतकात कार्ल लिनियस व कॉम्त दी बूफॉन यांचे काम आणि चार्ल्स डार्विन व आल्फ्रेड वॉलेस यांच्या सिद्धांतांमुळे उत्क्रांतिसंकल्पनेला मोठी चालना मिळाली. मानव हा इतर प्राण्यांपेक्षा सर्वस्वी वेगळा असून तो विश्वनिर्मात्याने खास निवडलेला आहे; म्हणूनच त्याचे निश्चित असे काहीतरी जीवनकार्य आहे, त्यामुळे मानवी उत्क्रांतीचा विषय विज्ञानाचा नसून धर्मज्ञानाचा व अध्यात्माचा आहे, या जुन्या मतप्रणालीला डार्विन-वॉलेस सिद्धांताने जबरदस्त आव्हान दिले. उत्क्रांतीचा सिद्धांत एवढा क्रांतिकारक होता की, विश्वनिर्माता कल्पनेच्या पुरस्कर्त्यांनी आणि धर्मवेत्त्यांनी त्याची टर उडवली. जीवविज्ञानात हा सिद्धांत सर्वमान्य झाला असला, तरी उत्क्रांतीच्या सिद्धांताला अमान्य करणाऱ्या अनेक विरोधी विचारधारा आहेतl



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions