Saved Bookmarks
| 1. |
Marathi essay on Nainital |
|
Answer» नैनिताल भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक शहर आहे. हे शहर नैनिताल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हे एक लोकप्रिय गिरीस्थान आहे. नैनिताल समुद्रसपाटीपासून २०८४ मीटर उंचीवर एका दरीत वसलेले आहे.नैनिताल हे नाव या गावातील प्रसिद्ध नैनी तलावावरून पडले आहे. नैनितालच्या सभोवती हिमालयीन पर्वतरांगेतील पर्वत आहेत. उत्तरेला नैना (२६१५ मीटर), पश्चिमेला देवपाठा (२४३८ मीटर), दक्षिणेला अयरपाठा (२२७८ मीटर) हे पर्वत आहेत. या पर्वतांच्या शिखरावरून हिमालयातील बर्फाच्छादित पर्वतांचे सुंदर दृश्य दिसते. |
|