|
Answer» नमस्कार मंडळी,
★ पृथ्वी बोलू लागली तर ...
काल घरापुढे झाडे लावण्यासाठी खड्डा खोदत असताना अचानक मनात विचार येऊन गेला. की मी हे खोदकाम करत असताना जमिनीला त्रास तर होत नसेल ना. जर अचानक पृथ्वी आपल्याशी बोलू लागली तर ...
'काय दादा, काय चाललंय? झाडे लावण्यासाठी खड्डा खोदताय. अतिउत्तम. माझी काळजी कटू नका. या कुदळीच्या घावाने जेवढे दुःख होत नाही तेवढा आनंद एका वृक्षाच्या लागवडीने होतो मला.'
'आज बोलावसं वाटलं तुमच्याशी. तुम्ही एवढे सगळे पृथ्वीवर वास करता. या सगळ्यांचा भार मी आनंदाने पेलते. परंतु तुम्ही हे भूमीप्रदूषण करतात त्यामुळे पृष्ठभागावरील माती उडून जाते. त्या घातक रसायनांमुळे माझी सुपिकता कमी होत चाललीये. याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवे.'
'आपण एकेमकांची काळजी घेतली तरच दोघाचे अस्तित्व असेल ही गोष्ट तुम्ही ध्यानात घ्यायला हवी.' मागून अचानक आवाज आला का थांबलास रे सुरज, आणि मी कल्पनेतून बाहेर आलो.
धन्यवाद....
|