| 1. |
महाराष्ट्राचे आरध्यदैवत छ. शिवाजी महाराज यांची विचारसरणी... |
|
Answer» महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी सगळ्यांत लोकप्रिय राजे आहेत. मुंबई विमानतळ आणि रेल्वे स्थानकाला त्यांचं नाव आहे. अरबी समुद्रात त्यांचं भव्य स्मारक करण्याची योजना आहे. त्यांच्या राजकीय विचारसरणीची सर्वजण आपापल्या पद्धतीने आठवण करत असतात.काही लोक त्यांना 'गोब्राह्मण प्रतिपालक' (ब्राह्मण आणि गायींचे रक्षक) म्हणतात. काही जण सांगतात की लोक त्यांना 'कल्याणकारी राजा' म्हणायचे.शिवाजी मुस्लीमविरोधी होते, असाही एक मतप्रवाह आहे.काही वर्षांपूर्वी मिरज-सांगली भागात गणेशोत्सवाच्या वेळी एका देखाव्यावर शिवाजी अफजलखानाला मारताना दाखवलं होतं. एक हिंदू राजा एका मुसलमानाला मारत आहे, अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली. ते पोस्टर संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलं आणि नंतर जातीय हिंसाचार झाला. |
|