1.

Mi pahileli aag. Essay in Marathi . Fast please

Answer»

ANSWER:

एकदा मी माझ्या मामाकडे राहायला गेली होती. मी आणि माझी बहीण बेडरूम मध्ये टीव्ही पाहत होतो आणि माझा छोटा भाऊ दिवाणखान्यात खेळत होता.

अचानक, माझ्या छोट्या भावाने आमच्या खोलीचे दार ठोकायला सुरुवात केली. जेव्हा आम्ही दार उघडले, तेव्हा तो म्हणाला, मला दिवाणखान्यात धूर दिसतोय. दिवाणखान्यात गेल्यावर,बघतो काय, सगळीकडे धूरच धूर!

तिथे इतका धूर झालेला की आम्हाला एकमेकांचे चेहरे देखील दिसत नव्हते. काही मिनिटांतच सोफाही आग पकडू लागला. हळूहळू आग वाढू लागली.आम्ही काय करावे हे सूचत नव्हते.आम्ही शेजाऱ्यांकडे धावत गेलो आणि त्यांना बोलवले. ते आले, सरळ स्वयंपाकघरात गेले, पाण्याने बादल्या भरुन घेतल्या आणि त्यांनी आगीवर पाणी टाकले.आग विझायला लागली, पण धूर अजूनही होता.आम्ही ताबडतोब संपूर्ण घराच्या खिडक्या उघडल्या. काही वेळानंतर, परिस्थिती नियंत्रणात आली.

माझा मामा नेहमी सोफ्याजवळ असलेल्या देवाच्या मूर्तीजवळ अगरबत्ती पेटवतो. त्या दिवशी नकळत कदाचित सोफ्यावर थोडी राख पडली असावी आणि हा सगळा प्रकार झाला असावा! आम्ही देवाचे आभार मानले की कुठल्याही प्रकारची जीवहानी झाली नाही आणि थोडक्यात निभावलं.

Explanation:



Discussion

No Comment Found