1.

मी क्रिडांगण बोलतोय मराठी निबंध, भाषण, लेख | आत्मवृत्तपर मराठी...

Answer»

ANSWER:

नमस्कार! मी तुम्हा मुलांचा जिवाभावाचा मित्र क्रीडांगण बोलतोय. तुम्ही मला खेळाचे मैदान असेही म्हणता.

जेव्हा तुम्ही माझ्या अंगावर आनंदाने उड्या मारून खेळता तेव्हा मला फार आनंद वाटतो. माझ्या अंगावर तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करता. तेव्हा तुमचा उत्साह पाहून मला वेगळीच ऊर्जा मिळते. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनांमुळे मलासुद्धा तुमच्या संस्कृतीची ओळख होते.

परंतु जेव्हा तुम्ही माझ्या अंगावर कचरा टाकून घाण करता तेव्हा मला फार वाईट वाटते. मी तुमच्या इतक्या उपयोगी येतो तेव्हा कृपया मला अस्वच्छ करू नका आणि खेळण्यासाठी माझा चांगला वापर करा ही विनंती.

Explanation:



Discussion

No Comment Found