InterviewSolution
| 1. |
मी पक्षी झालो तर निबंध |
|
Answer» ⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀मी पक्षी झालो तर निबंध लहानपणापासून मला पक्ष्यांविषयी खूप आकर्षण आहे. अगदी लहानपणीही मी गणात येणाऱ्या पक्ष्यांकडे एकटक पाहत बसत असे आणि जरा मोठा झाल्यावर, वाचता मेऊ लागल्यावर मी पक्ष्याविषयीची खुप माहिती गोळा करू लागलो. तेव्हा मला पक्षिजीवनाची खूप ओळख झाली; पण त्याचबरोबर त्यांच्यातील विविधताही कळली. माझा हा छंद ओळखून माझ्या बाबांनी मला एक छान दुर्बीण आणून दिली आहे. त्यामुळे उंच उडणा-या पक्ष्यांचेही मी आता चांगले निरीक्षण करू शकतो. असाच एकदा पक्षी पाहत असताना माझ्या मनात आलं, 'खरंच, मी स्वतःच पक्षी आहाहा मला सुंदर पंख मिळतील, माझं अंग मऊ मऊ असेल. माझा रंग आकपक असेल. कदाचित डोक्यावर तुरा आणि लांब शेपटीही असेल. पक्षी झाल्यावर मी माझे पंख पसरून शांतपणे आकाशात विहार करीन. पंख फडफडवत कमी उंचीवरून उडणारे पक्षी मला विशेष आवडत नाहीत. पण उंच आकाशात आपले पख पसरून शांतपणे उडणारे पक्षी मला फार आवडतात. हे पक्षी ऋतुमानाप्रमाणे आपले देश बदलत असतात. त्यासाठी हजारो किलोमीटर्सचा प्रवास ते करतात. मी पक्षी झालो तर असाच विविध देशांना भेटी देईन प्रवास करायला मला खूप आवडतं. शिवाय पक्षी झालो तर या गावातून त्या गावात जायला तिकीट काढायला नको की, एका देशातून दुसन्या देशात जायला पासपोर्ट नको किंवा व्हिसापण नको. जगातील सर्व महत्त्वाच्या आणि सुंदरnस्थळांना मी भेटी देईन. दमलो को झाडावर बसावं. आवडतील ती फळे खावीत. मनाला वाटल नेधे पाणी प्यावं. एकूण काय, सगळा आनंदीआनंद ! स्वच्छंदपणा !! स्वातंत्र्य !!! पक्षी झाल्यावर परीक्षेची काळजी नाही, अभ्यासाची कटकट नाही, पुढे कोणत्या प्रकारचं शिक्षण व्यावं हा प्रश्न नाही, नोकरी की व्यवसाय ही चिंता नाही. घराचा, जागेचा प्रश्न नाही. शहरातील गर्दी नाही. पण... पण मनात आलं, त्या पक्ष्यांच्या जगातसुद्धा काही प्रश्न असतीलच. कोणत्या झाडावर कोणी राहावे, याबाबत नियम असतीलच. आपल्यासारख्या आगंतुकाला ते सामावून घेतील का? आपण पक्षी होऊन वेगवेगळे देश पाहिले, तरी त्याचं वर्णन आपण कोणाला सांगणार? कारण पक्षिजगतातील इतरांना त्याचं कौतुक वाटणार नाही. आपले आजचे जे मित्र आहेत त्यांच्याशी आपण बोलू शकणार नाही. आपल्या प्रवासाचं वर्णन आपण लिहू शकणार नाही. बापरे! कसलं हे जीवन ! चित्रं काढता येणार नाहीत.साधा फोटोही घेता येणार नाही. नको रे बाबा पक्षी होणं ! मी आपला माणूस आहे तोच बरा !! |
|