1.

मला पडलेले सुंदर, मजेदार स्वप्न मराठी निबंध, भाषण, लेख

Answer»

"स्वप्नात पाहिली बाग

हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग"

मित्रांनो अशीच चित्र विचित्र स्वप्नं मला पडत असतात. एका स्वप्नात मी घनदाट जंगलात होतो, माझ्याबरोबर माझे दोन मित्र आले होते पण आम्ही मार्ग चुकलो आणि एकटा पडलो. माझ्याकडे ना खाणं होतं ना प्यायला पाणी. मी हळु हळु चालत होतो.

संध्याकाळची वेळ जवळ येऊ लागली, सूर्य मावळला व सगळीकडे काळोख झाला. इतक्यात मला माझ्या मागून डरकाळी चा आवाज आला. माझे हात पाय कापू लागले. मी मागे बघितला तर वाघ उभा होता. तो माझ्याकडेच पळत येत होता एवढ्यात माझा गजर वाजला व मला जाग आली.



Discussion

No Comment Found