

InterviewSolution
1. |
मोसमी प्रदेश टिपा लिहा? |
Answer» वर्षाच्या विशिष्ट ऋतूत पडणाऱ्या पावसाला मोसमी पाऊस किंवा मॉन्सून म्हणतात. अर्थात, भारतीय उपखंडातील मोसमी पावसालाही मॉन्सून म्हणतात. भारताच्या बाबतीत हा भारतातील शेतीवर, मानवी जीवनावर आणि भारताच्या आर्थिक बाबींवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. साधारणपणे, ठरावीक काळाने दिशा बदलणारे वारे यांना मॉन्सून म्हंटले जाते. भारताखेरीज जगातल्या आणखीही काही भागातही मॉन्सून असतो. उदा. आफ्रिकेतील सहारा वाळवंटाच्या पश्चिमेकडील भाग नैर्ऋत्य अमेरिका आणि मेक्सिको दक्षिणी चीन, कोरिया, जपानचा काही भाग इंडो-चायना, फिलिपाइन्स, व्हिएतनाम, मलाया, जावा, सुमात्रा, बोर्निओ, उत्तरी ऑस्ट्रेलिया आयर्लंड, ग्रेट ब्रिटन, पश्चिम जर्मनी, उत्तरी फ्रान्स आणि स्कॅन्डेनेव्हियाचे काही भाग. असे असले तरी, वर सांगितलेल्या देशांत पावसाचे अन्य ऋतूही असतात. भारतीय उपखंडाचे तसे नाही. येथे जून ते सप्टेंबर हा पावसाचा ’पावसाळा’ नावाचा एकमेव ऋतू आहे. भारताच्या नैर्ऋत्येकडून हा पावसाळा येतो म्हणून त्याला त्याला ’नैर्ऋत्य मॉन्सून’ म्हणतात. ज्या वाऱ्यांबरोबर हा पाऊस भारतात प्रवेश करतो ते वारे हिंदी महासागर व अरबी समुद्र यांवरून येतात. २३ सप्टेंबर या दिवशी नंतर भारतीय उपखंडातून जेव्हा हा ’नैर्ऋत्य मॉन्सू्न’ परततो तेव्हा परतीच्या वाटेवरील भारताच्या ईशान्य भागाला व पूर्व किनाऱ्याला पाऊस देतो. त्या ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात पडणाऱ्या पावसाला ’ईशान्य मॉन्सून’चा पाऊस असे म्हणतात. हा पडणारा प्रदेशाचे क्षेत्र भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या मानाने अत्यल्प असते. या पावसात विजांचा कडकटाड, विजेचे लोळ आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस या घटना दिसून येतात. दरवर्षी भारतात पडणाऱ्या या मोसमी पावसाचे प्रमाण आणि स्वरूप एकसारखे नसते. या पावसावर परिणाम करणारे वातावरणात अनेक घटक आहेत. त्यापैकी दक्षिण अमेरिकेजवळून वाहणारे एल निनो व ला निनो हे सागरी प्रवाहही आहेत. |
|