InterviewSolution
| 1. |
मराठी विक्ष्वकोश म्हणजे काय? |
|
Answer» मराठी विश्वकोश हा महाराष्ट्र शासन तयार करवून घेत असलेला आणि मुळात पुस्तकरूपात असलेला मराठी ज्ञानकोश आहे. तो आता डिजिटल झाला आहे. हा ज्ञानकोश आंतरजालावर ऑनलाइन व मोफत वाचता येतो. मराठी विश्वकोशाच्या विसाव्या खंडाचा पूर्वार्ध जानेवारी २०१५मध्ये आणि उत्तरार्ध जून २००१५मध्ये प्रकाशित करण्यात आला. मूळ २० छापील खंडांचे डिजिटायझेशन करून ते क्रमाक्रमाने आंतरजालावर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम २५ ऑक्टोबर २०११ पासून सुरू झाला. प्रकाशित झालेले २० खंड आंतरजालावर सीडॅकच्या सहकार्याने आले आहेत. मानव्य विद्या विज्ञान व तंत्रज्ञान यांतील सर्व विषयाचे ज्ञान एका व्यापक योजनेखाली संकलित करणारा असा हा मराठी विश्वकोश कोणताही एक महत्त्वाचा विषय अन्य अनेक विषयांशी संलग्न असतो . महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने पुण्यातील ‘सी-डॅक जिस्ट’च्या सहकार्याने निर्माण केलेल्या ‘मराठी विश्वकोश डॉट इन’ या वेबसाइटला ई-गव्हर्नन्सचा ‘प्लॅटिनम ॲवॉर्ड’ मिळालेला आहे. मराठी विश्वकोशात सुमारे शंभर विषयांवरील विविध नोंदींचा समावेश आहे. मानव्यविद्या संपादन करा पहा मुख्य लेख : मानव्यविद्या अर्थशास्त्र अलंकरण, वेश इ. इतिहास कनिष्ट कला व कारागिरी कला खेळ व मनोरंजन ग्रंथालयशास्त्र चलचित्रविद्या चित्रकला जगातील भाषा व साहित्ये तत्त्वज्ञान धर्म नृत्य पुरातत्त्वविद्या भाषाशास्त्र भूगोल मानवशास्त्र मानसशास्त्र मूर्तिकला (शिल्पकला) युद्धशास्त्र रंगभूमी राज्यशास्त्र लिपिप्रकार वास्तुकला विधी वृत्तपत्रविद्या शिक्षणशास्त्र संगीत समाजशास्त्र साहित्यप्रकार साहित्यविषयक संकीर्ण विषय साहित्यसमीक्षा विज्ञान व तंत्रविद्या संपादन करा अभियांत्रिकी अणुक्रेंदीय नाविक यांत्रिक रासायनिक विद्युत् वैमानिकी संदेशवहन स्थापत्य स्वयंचल अवकाशविज्ञान उद्योग व व्यापार कीटकविज्ञान कृषिविज्ञान गणितशास्त्र जीवरसायनशास्त्र ज्योतिषशास्त्र धातुविज्ञान पशुविकारविज्ञान प्राणिविज्ञान भूविज्ञान भौतिकी मत्स्योद्योग रसायनशास्त्र वनस्पतिरोगविज्ञान वनस्पतिविज्ञान वातावरणविज्ञान वैद्यक : (१) मानवी, (२) पशू (अ) औषधविज्ञान, (आ) चिकित्सा, (इ) रोगविज्ञान. वैज्ञानिक संस्था शारीरक्रियाविज्ञान शारीर संग्रहालये सांख्यिकी सूक्ष्मजीवविज्ञान |
|