1.

नागरिकांची सनद ही संकल्पना कोणती आहे

Answer»

'नागरिकांची सनद' म्हणजे सरकारचे लोकांप्रतीचे उत्तरदायित्व (Accountability) दर्शविणारा 'दस्तऐवज' असतो. जनतेच्या अपेक्षा वाढत आहेत. त्या पूर्ण करण्याच्या दिशेने सरकारने टाकलेले पाऊल म्हणजे 'नागरिकांची सनद' होय. महाराष्ट्र शासकीय कामात (विलंब करण्यास प्रतिबंध करण्याचा) अधिनियम, 2005 मधील कलम 10 मध्ये नागरिकांच्या सनदेची तरतूद केली असल्याने नागरिकांची सनद प्रसिद्ध करणे, ही प्रत्येक विभागाची तसेच त्यांचे अधिपत्याखालील कार्यालयांची कायदेशीर जबाबदारी आहे. शासकीय यंत्रणांकडून ज्या सेवा नागरिकांना मिळतात, त्या किती वेळात व कुठल्या दर्जाच्या असतील याची माहिती नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची असते. उदा. खड्ड्यांची किंवा खराब रस्त्यांची दुरुस्ती किती वेळात होणार? नवीन नळजोड कनेक्शन किती वेळात मिळणार? पाणी कमी दाबाने येणे रस्त्यावरील दिवे लागत नसणे, याबाबतच्या तक्रारीची कोण व किती वेळात दखल घेणार याची माहिती वीजपुरवठा खंडित झाला तर किती वेळात दुरुस्त होणार, नवीन वीज कनेक्शन अर्ज केल्यापासून किती दिवसात मिळणार याची माहिती वाहन परवान्याचे नूतनीकरण, वाहनांच्या हस्तांतरणाची नोंद करणे याबाबतची माहिती सर्वसाधारणपणे वरील गोष्टींचा समावेश नागरिकांच्या सनदेमध्ये होतो. त्याआधारे विविध खात्यांना कार्यतत्पर आणि बांधील बनवता येऊ शकते.please mark my answer as a BRAINLIST



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions