InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
नाताळ बद्दल १० ओळी, वाक्ये, निबंध, भाषण मराठी मध्ये | 10 lines... |
|
Answer» ख्रिश्चन बांधव नाताळ हा सण साजरा करतात.भगवान येशू ख्रिस्त यांचा जन्म २५ डिसेंबर रोजी झाला.म्हणून हा सण २५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. नाताळात सगळे ख्रिश्चन बांधव आपली घरे सजवतात.घरासमोर दिव्याची चांदणी लावतात.घरात ख्रिसमस ट्री आणून त्याला सजवतात. या सणाला ख्रिश्चन बांधव एकत्र येतात.चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात.घरी केक आणि इतर गोड गोड पदार्थ तयार करतात.सामूहिक नृत्य-गायन करतात. लहान मुलांची नाताळात फार मजा असते.सांताक्लॉज मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या भेटी देतो.लोक आपल्या नातेवाईकांना व मित्रांना भेटी देतात,शुभेच्छा देतात. नाताळमध्ये सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. Explanation: |
|