| 1. |
Nati harapt chalela samaj essay in marathi |
|
Answer» नातेसंबंध बिघडल्यामुळे समाजस्वास्थ्यावर परिणाम झाला आहे का?..अशी चर्चा ‘प्रहार’ने वाचकांमध्ये घडवून आणली. त्याला वाचकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. जिव्हाळ्याच्या नात्यांना तडा जाऊ लागला आहे. ही नाती दुरावत आहेत. पण याला परस्परांमधील ‘इगो’, आपापसांतील विसंवाद आणि एकमेकांविषयी कमी होत चाललेला विश्वास, सुसंवाद कमी होत असल्याचे दिसूनही ही दरी कमी करण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत, युवा पिढी पालकांशी संवाद न साधता आत्मकेंद्रित आणि मित्रांनाच जास्त जवळ करणारी झाली आहे. ती पालक व बहीण-भावाऐवजी ‘मोबाइल’शी जास्त ‘संवाद’ साधताना दिसतात. मुलांनाही मते आहेत याचा विचार पालकही न करता स्वत:चे विचार त्यांच्यावर लादताना आढळतात.. अशी परखड मते वाचकांनी व्यक्त केली. आजच्या सामाजिक बदलांच्या प्रवाहात भारतीय कुटुंबांचा मूळ चेहराच बदलतोय! ‘एकत्र कुटुंब ते ‘न्युक्लिअर फॅमिली’ व त्याचे परिणाम अनुभवल्यानंतर आता ‘सिंगल- पॅरेंट्स’ नवी इनिंग सुरू झाली आहे. यापुढे ‘दोन सिंगल पॅरेंट्स’ पुन्हा लग्न करून एकत्र येत असल्याचं निकट भविष्यात अनुभवास येणार आहे. सारांश-संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे पूर्वापार रुजलेली उदात्त सांस्कृतिक मूल्ये आज पार लयास चाललेली दिसताहेत. त्यामुळे कुटुंबात परस्परांची योग्य काळजी घेणे, रास्त जबाबदारींची जाणीव ठेवणे, परस्परांचा सन्मान करणे आणि समजून घेणे हे ‘प्रेमाचे चार पैलू’ जणू माणसं विसरूनच गेले आहेत. मुलांच्या पौगंडावस्थेत त्यांच्या मानसिकतेचा एकाकीपणा, गोंधळाचा आज गांभीर्याने पालक व समाजाकडून केलाच जात नाही. अशा परिस्थितीत आजच्या पिढीच्या मनातील विचार प्रदुषित होऊन ‘आचारांचा स्वैराचार बोकाळणारच, विकृत मानसिकता, सैतानी प्रवृत्ती अनियंत्रित व असंयमित झाल्यामुळे अविचारानं आपला कधीही आत्मघात होऊ शकतो. हे माणूस तत्त्वत: विसरून गेला आहे. परिणामत: परस्परातील प्रेम, जिव्हाळा, सामंजस्य, नैतिकता किंवा सहकार्याच्या नात्यात दुरावा येऊन ‘नात्यातला विश्वास’ हरवला आहे. त्यासाठी नात्यातला विश्वासपूर्वस्थापित करण्यासाठी सर्वच स्थरांवर सर्वानीच इच्छाशक्तीनं जाणीवपूर्वक प्रयत्न करणं अनिवार्य झालं आहे. |
|